बातम्या

Trending:


बीजेडीचा तोटा, कॉंग्रेसचा फायदा?

ओडिशात भाजपने जबरदस्त विजय मिळवल्यामुळे या झंझावातात बिजू जनता दलाचे अस्तित्व कितपत टिकते हे पाहावे लागेल. ही काँग्रेसलाही संधी असेल. तसे झाले तर राज्याचे राजकारण पुन्हा राष्ट्रीय पक्षांकडे जाईल...


IIT Bombey : नाटकात प्रभू श्रीराम, सीतामातेचा अपमान केल्याचा आरोप; IIT बॉम्बेकडून विद्यार्थ्यांना 1.2 लाखांचा दंड

IIT Bombey : रामायणावर (Ramayana) कथितरित्या आक्षेपार्ह्य नाटकाचं सादरीकरण केल्याप्रकरणी आयआयटी बॉम्बेनं (IIT Bombey News) विद्यार्थ्यांना दंड ठोठावला (Students Were Fined) आहे. हा दंड थोडा थोडका नसून तब्बल 1.2 लाखांचा आहे. 31 मार्च रोजी आयआयटी बॉम्बेचा वार्षिक कला मोहोत्सव (IIT Bombay Annual Art Festival) पार पडला. याच कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी रामायणावर आधारित नाटक सादर करण्यात आलं. पण या नाटकात भगवान सीता-रामाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात...


Rohit Pawar On Ajit Pawar : लोकसभेच्या पराभवासाठी महायुतीकडून अजितदादांचा बळीचा बकरा

Rohit Pawar On Ajit Pawar : लोकसभेच्या पराभवासाठी महायुतीकडून अजितदादांचा बळीचा बकरा रोहित पवारांनी पुन्हा एका भाजपसह अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय. लोकसभेच्या पराभवासाठी महायुतीकडून अजितदादांना बळीचा बकरा बनवला जात असल्याची टीका रोहित पवारांनी केलीय. तिरंगी लढतीसाठी तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजितदादा बळीचा बकरा बनवला जात असून येत्या कालात अजितदादांना वेगळं होण्यासाठी भाग पाडले जाईल असा दावा रोहित पवारांनी केलाय. दरम्यान भुजबळांसह अनेक आमदार आणि नेते अधिवशेनानंतर पक्ष सोडतील असा दावा रोहित पवारांनी केलाय. तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं तेव्हाच बोलायला हवं होतं.. असं सांगत बच्चू कडू यांनी निशाणा साधलाय.. विआ च्या विरोधात दुहेरी लढतीत जनता आपल्याला पराभूत करते म्हणून तिरंगी लढत झाली पाहिजे, तिरंगी लढत झाल्यास सर्वसामान्य जनतेची मते विभागली जाऊन भाजपला फायदा होतो, असा भाजपच्या #चाणक्यांचा कयास आहे. त्यामुळेच तिरंगी लढतीसाठी तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजितदादांना बळीचा बकरा करण्यात येत असून आधी #आरएसएस च्या मुखपत्रातून टीका, नंतर झोपलेले तथाकथित गांधी जागा करायचे आणि आता पुढे काहीतरी करून अजितदादांना वेगळे होण्यास भाग पाडायचे ही रणनीती चाणक्यांनी दिल्लीत मांडली असल्याची चर्चा आहे.


ठाकरे गट मोदींकडे जाणार? छगन भुजबळ ठाकरे गटात येणार? उद्धव ठाकरे यांचा भर सभेत खुलासा

ठाकरे गट मोदींकडे जाणार? छगन भुजबळ ठाकरे गटात येणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळाता लंगली आहे. उद्धव ठाकरे यांनी भर सभेत याचा खुलासा केला आहे.


Rahul Gandhi Happy Birthday : राहुल गांधींच्या वाढदिवशी काँग्रेसकडून कुलरचं वाटप!

राहुल गांधी यांनी यंदा लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश संपादन केलं आहे. वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून त्यांना यश मिळालं. त्यांनी वायनाडची जागा सोडली असून या ठिकाणाहून आता प्रियंका गांधी निवडणूक लढवणार करणार आहेत.


23 वर्षांच्या तरुणीचे 80 वर्षांच्या वृद्धाशी लग्न!

बीजिंग : काही जोड्या पाहिल्या की, ‘रबने बना दी जोडी’ असे म्हणावेसे वाटते! आता चीनमध्ये 23 वर्षांच्या एका तरुणीने 80 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीशी लग्न करून सर्वांना चकित केले आहे. घरच्यांचा विरोध पत्करून तिने या वृद्ध माणसाशी लग्न केले. दोघांचे रोमँटिक फोटोही आता व्हायरल झाले आहेत! चीनच्या एका वृद्धाश्रमात काम करणारी तरुणी तिथेच राहणार्‍या या 80 …


Shivsena Foundation Day : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांनध्ये उत्साह

Shivsena Foundation Day : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांनध्ये उत्साह शिवसेनेचा ५८वा वर्धापन दिन आज ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना स्वतंत्रपणे साजरा करणार आहेत.. या वर्धापन दिना निमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटांचे कार्यक्रम होणार आहे.. ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन माटुंगा येथील बन्मुखानंद सभागृहात होत आहे तर शिंदे गटाचा वर्धापन दिन सोहळा वरळी येथील डोम एनएससीआय सभागृहात होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे बिगुल दोन्ही शिवसेना नेते या मेळाव्यात फुंकण्याची शक्यता आहे शिवसेनेतल्या पक्ष फुटीनंतर हा दुसरा वर्धापन दिन आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आपला वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहेत. शिंदेंचा वर्धापन दिन मुंबईत वरळी डोम इथं तर ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा लागलेला निकाल आणि तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर या वर्धापन दिनाला महत्त्व आहे.


Dombivali MIDC News : आगीच्या घटनांनंतर डोंबिवली एमआयडीसीचे स्थलांतर होणार का ?

Dombivali MIDC News : डोंबिवली एमआयडीसीतील आगीच्या आणि स्फोटाच्या घटनांनंतर प्रशासनाला अचानक जाग आली आहे. स्थानिकांनी डोंबिवली एमआयडीसीतील सगळ्या केमिकल कंपन्यांचे स्थलांतर करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या मागणीची दखल घेतली आहे.


Alibaug Beach: पुण्यातून मित्रांसोबत अलिबागला फिरायला आला अन् असं काही विपरीत घडलं, समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू

Pune youth drown in Alibaug: पुण्यातून मित्रांसोबत अलिबाग येथे फिरायला आलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. अलिबाग येथील समुद्रात बुडून या तरुणाचा मृत्यू झाला आहे. मृतक तरुण हा 28 वर्षीय असल्याची माहिती समोर आली आहे.


Ravindra Waikar: रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नका, लोकसभेच्या सरचिटणीसांकडे नोटीस

मुंबई: रवींद्र वायकर यांचे लोकसभा निवडणूक जिंकणे वादग्रस्त व शंकास्पद आहे, येथे पारदर्शक व कायदेशीर वातावरणात मतमोजणी झालेली नाही. त्यामुळे त्यांना लोकसभेत खासदार म्हणून शपथ देऊ नये, अशी मागणी उत्तर पश्चिम मतदारसंघातून (North West Mumbai Lok Sabha constituency) लोकसभा निवडणूक लढलेले हिंदू समाज पार्टीचे एक उमेदवार भरत शाह (Bharat Shah) यांनी त्यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे (Asim Sarode) यांच्यामार्फत लोकसभा सरचिटणीस उत्पलकुमार सिंग यांना नोटीस...


Police Bharti Maharashtra : अमरावतीत 281 पदांसाठी पोलीस भरती सुरू

Police Bharti Maharashtra : अमरावतीत 281 पदांसाठी पोलीस भरती सुरू संपूर्ण राज्यभरात रखडलेल्या पोलीस भरतीला अखेर मुहूर्त सापडलाय. आजपासून पोलीस भरतीला सुरूवात झालीय. अमरावतीत 281 पदांसाठी पोलीस भरती सुरू आहे...शहरातील 74 जागेसाठी 4 हजार 789 तर ग्रामीणच्या 207 जागेसाठी 25 हजार 549 विद्यार्थी मैदानी चाचणी देणार आहेत.. यादरम्यान कुठल्याही विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी देखील घेण्यात आली आहे.. .. दरम्यान याचा आढावा घेतलाय ामचे प्रतिविधी प्रणय निर्बाण यांनी अमरावतीत 281 पदासाठी पोलीस भरती मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे.. अमरावती शहरासाठी 74 आणि ग्रामीण 207 असे एकूण 281 जागांसाठी ही भरती होणार असून शहरातील 74 जागेसाठी 4 हजार 789 तर ग्रामीणच्या 207 जागेसाठी 25 हजार 549 विद्यार्थी मैदानी चाचणी देणार आहेत.. यादरम्यान कुठल्याही विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी देखील घेण्यात आली आहे.. पोलीस भरती संदर्भात कुठल्याही प्रलोभनात विद्यार्थ्यांनी बळी पडू नये असे आवाहन देखील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडून करण्यात आले आहे..


SSC GD Results 2024: खुशखबर..! निकाल जाहीर होण्याआधीच रिक्त पदांची संख्या झाली दु्प्पट, येथे पाहा सुधारित जागा

SSC GD Results 2024 : एसएससी जीडी निकाल २०२४ जाहीर होण्यापूर्वी, रिक्त पदांच्या संख्येत बदल करण्यात आला आहे. रिक्त पदांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. नवीन रिक्त पदांची संख्या ४६,६१७ झाली आहे. वाचा सविस्तर..


IOCL Recruitment 2024 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती

IOCL Recruitment 2024 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत कोणत्या पदांवर नोकरीची भरती करण्यात येणार आहे, याची माहिती इच्छुक उमेदवारांनी पाहा.


Manoj Jarange Exclusive : 127 जागांची चाचपणी पूर्ण, मनोज जरांगे विधानसभा लढवण्याच्या तयारीत

Manoj Jarange Exclusive : 127 जागांची चाचपणी पूर्ण, मनोज जरांगे विधानसभा लढवण्याच्या तयारीत सरकारने आरक्षण दिले नाही तर मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी 127 जागांवर पहिला सर्व्हेदेखील केला आहे. खुद्द जरांगे यांनी एबीपी माझाशी बोलताना ही घोषणा केली आहे. मात्र ते स्वतः निवडणूक लढवणार नाहीत.. स्वतःचा पक्ष काढून उमेदवार उभे करायचे की अपक्ष म्हणून उभे करायचे हे अजून ठरलेलं नाही. वेळ आली तर मराठा, मुस्लिम आणि दलित, लिंगायत यांची मोट बांधून निवडणूक लढवणार असंही जरांगेंनी सांगितलंय. मनोज जरांगे म्हणाले, सरकारला मी वेळ दिलेला नाही, सरकारने वेळ घेतला आहे. मी अगोदर देखील सांगितले होती की, आम्ही तयारी करतोय. माझा आणि माझ्या समाजाचा दोघांचाही राजकरणात येण्याचा कोणताही उद्देश नाही पण सरकारच आम्हाला राजकारणात ढकलत आहे. आम्ही पहिल्या टप्प्यात 24 मतदारसंघाची चाचपणी केली आहे. आम्ही शोध घेत आहे. आम्ही शांत का बसावे? कोणत्याही समाजावर अन्याय नाही झाला पाहिजे. इतर समाजांनी देखील आमच्यासोबत आले पाहिजे, यासाठी चाचपणी करत आहे.


Hajj Yatra 2024: हज यात्रेदरम्यान ६४५ लोकांचा मृत्यू; ६० हून अधिक भारतीयांचा समावेश; काय आहे कारण?

Hajj Yatra 2024: उष्णतेच्या लाटेचा कहर केवळ भारतातच नव्ह तर सौदी अरेबियातही दिसून येत आहे. एपी एजेंसीनुसार बुधवारी जवळपास ६४५ हज यात्रेकरूंच्या मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये ६० हून अधिक भारतीयांचा समावेश आहे.


MSP Increase Modi Cabinet: शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 14 पिकांच्या एमएसपीत वाढ, केंद्र सरकारचा निर्णय

MSP Increase Modi Cabinet: केंद्रातील एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक 19 जून रोजी पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत मंत्रिमंडळाने खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत 14 खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.


Underwater Drone: पुण्यात साकारणार पाण्याखालचा 'ड्रोन'; देशातील पहिला वहिला प्रकल्प, कसा होणार फायदा?

Underwater Drones : पुण्यातील ‘सागर डिफेन्स इंजिनिअरींग’ या कंपनीला दिली असून, संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) तंत्रज्ञान विकास निधी प्रकल्पाअंतर्गत हा प्रकल्प विकसित केला जाणार आहे.


Marathwada water Supply : मराठवाड्याला 1 हजार 841 टँकरनं पाणीपुरवठा ; पावसाळ्यातही पाणीबाणी

Marathwada water Supply : मराठवाड्याला 1 हजार 841 टँकरनं पाणीपुरवठा ; पावसाळ्यातही पाणीबाणी पावसाळा सुरू होऊन दोन आठवडे उलटले, तरीही मराठवाड्यात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सुमारे 20 लाख नागरिकांची तहान टँकरद्वारे भागवली जात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सुमारे 10 टक्के नागरिकांना पाण्यासाठी वणवण करत असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात आज घडीला 2 हजार 97 गावांना 1 हजार 841 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे टँकरची संख्या भर पावसाळ्यात कमी होण्यापेक्षा वाढताना पाहायला मिळतात. 20 लाख नागरिकांची तहान टँकरद्वारे भागवली जात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सुमारे 10 टक्के नागरिकांना पाण्यासाठी वणवण करत असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात आज घडीला 2 हजार 97 गावांना 1 हजार 841 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे विशेष म्हणजे टँकरची संख्या भर पावसाळ्यात कमी होण्यापेक्षा वाढताना पाहायला मिळतात.


Maharashtra SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा | मुंबई सुपरफास्ट | ABP Majha | 3 PM

Maharashtra SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा | मुंबई सुपरफास्ट | ABP Majha | 3 PM राज्यात आजपासून पोलीस भरतीला सुरुवात, १७ हजार जागांसाठी १७ लाख अर्ज, ४० टक्के उमेदवार गरजेपेक्षा उच्चशिक्षित. आरटीई प्रवेशांबाबत माहिती देण्यास शाळांची टाळाटाळ, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती, प्रशासनाला योग्य ती माहिती सादर करण्याचे शाळांना हायकोर्टाकडून निर्देश शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या पुन्हा ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय, दुर्गम भागात सेवा देणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकांना मिळणार न्याय. रेशनकार्ड-आधारकार्ड लिंक करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत, याआधी 30 जूनपर्यंत मुदत होती एलआयसी मेट्रो शहरातील मालमत्ता विकणार असल्याची चर्चा, या मालमत्ता विक्रीतून सहा ते सात अब्ज डॉलर उभे करण्याची एलआयसीची योजना, मात्र एलआयसीने फेटाळली शक्यता पुढचे काही दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अंदाज. राज्यात यंदा पावसाच्या हंगामात सरासरीपेक्षा तीन मिमी जास्त पाऊस, राज्यात या काळात सरासरी १०२ मिमी पाऊस पडतो, मात्र यंदा प्रत्यक्षात १०५.८ मिमी पाऊस पडलाय.


भारतीय बांगड्यांची किणकिण ८००० वर्ष जुनी..

बांगड्या हा भारतीय स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. भारतीय संस्कृतीत बांगड्यांचा संबंध समृद्धीशी जोडला जातो. त्याच निमित्ताने प्राचीन काळापासून भारतीय उपखंडातील शंखांपासून तयार करण्यात येणाऱ्या बांगड्यांच्या इतिहासाचा घेतलेला हा आढावा.


mpsc ची तयारी: भूगोल (मुख्य परीक्षा)

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूगोल विषयाच्या यूपीएससी सामान्य अध्ययन मुख्य परीक्षा तयारीच्या लेखमालिकेत मागील लेखात आपण भूगोल विषयाचे महत्त्व, त्याचे स्वरूप व प्रश्नसंख्या यांची चर्चा केली. आज आपण भूगोलाच्या अभ्यासक्रमासंदर्भात सविस्तर चर्चा करू.


Panipuri Poisson Jalgaon : जळगावात पाणीपुरी खाल्ल्याने 80 पेक्षा अधिक जणांना विषबाधा

Panipuri Poisson Jalgaon : जळगावात पाणीपुरी खाल्ल्याने 80 पेक्षा अधिक जणांना विषबाधा कमळगाव आणि आजूबाजूच्या खेड्यांतील तसेच चांदसणी, मितावली, पिंप्री येथील ग्रामस्थ बाजारासाठी आले असताना तेथील पाणीपुरी विक्रेत्यांकडून अनेकांनी पाणीपुरी खाल्ली तर काहींनी पाणीपुरीचे पार्सल घरी नेले होते. या पाणीपुरी खाल्लेल्यांना मंगळवारी सकाळी उलट्या, जुलाब, पोटात दुखणे असे त्रास जाणवू लागले. यापैकी अनेक रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. परंतु, संध्याकाळी ६ वाजेनंतर अचानक रुग्णांमध्ये वाढ झाली. पाणीपुरीमुळे त्रास झाल्याबाबत सोमनाथ जगन कोळी (रा. पिंप्री) यांनी पोलिस स्टेशनला लेखी जबाब दिला आहे. अडावद येथे सायंकाळनंतर अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात पिंप्री, कमळगाव येथील विषबाधा झालेले सर्वच वयोगटातील रुग्ण वाढतच गेले. या ठिकाणाहून ७० पैकी ३० रुग्ण चोपडा येथे उपजिल्हा रुग्णालयात व इतर रुग्ण खासगी व जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. रात्री सुमारे १० रुग्णांवर अडावद येथे उपचार सुरू होते. घटना समजल्यानंतर चोपडा तालुका गटविकास अधिकारी रमेश वाघ तसेच आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर हे आरोग्य पथकांसह दाखल झाल्यावर उपचारास गती मिळाली. अडावद आरोग्य केंद्रात रुग्णसंख्येत वाढ होताच गावातील ग्रामस्थांनी मदत कार्यासाठी धाव घेतली.


Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासाठी मोठी बातमी, वाढवण बंदराला मंजुरी मिळाली

Today Breaking News LIVE Updates : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घडामोडींसहीत देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...


Mumbai Crime: पत्नीसोबतच्या भांडणाला कंटाळून हवालदाराची आत्महत्या

Mumbai Police Suicide: पत्नीसोबत होणाऱ्या दररोजच्या भांडणाला कंटाळून हवालदाराने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. मयत हवालदार हा मुंबई पोलीस दलात कार्यरत होता. त्याने 14 जून 2024 रात्री सायन येथील त्याच्या राहत्या घरात गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताच वडाळा टीटी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.


Naval Bajaj is New ATS Chief: नवल बजाज महाराष्ट्राचे नवे ATS प्रमुख!

Naval Bajaj Appointed As Maharashtra New ATS Chief : मुंबई : वरिष्ठ पोलीस अधिकारी नवल बजाज (Naval Bajaj) यांची महाराष्ट्र पोलीस दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदानंद दाते (Sadanand Date) यांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्र एटीएस प्रमुखाचं पद रिक्त होतं. त्यामुळे एटीएस प्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होतं. अखेर नवल...


Pune Porsche Accident: पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट, लाच घेताना रुग्णालयातील कर्मचारी CCTV मध्ये कैद

Pune Porsche Car Accident: पुण्यातील पोर्शे कार अपघाताबाबत आता आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ससून रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला लाच देण्यात आल्याचे एका CCTV फुटेजच्या माध्यमातून समोर आले आहे.


Smart Prepaid Electricity Meter : प्रिपेड वीज मिटरच्या निर्णयाचे तीव्र पडसाद; अनेक संघटनांनी दिला निर्वाणीचा इशारा

Nagpur News नागपूर : प्रिपेड वीज मिटरचा (Smart Prepaid Electricity Meter) वाढता विरोध निवडणूकीच्या काळात सत्ताधाऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरण्याची शक्यता आहे. कारण विदर्भासह राज्यातही या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटताना सध्या दिसत आहेत. महावितरणच्या नागपूर झोनमध्ये आतापर्यंत फक्त 100 प्रीपेड वीजमिटर लागले. पण त्या 100 मिटरच्या विरोधात आतापर्यंत ठिकठिकाणी 25 आंदोलनं झालीय. प्रीपेड वीजमीटर विरोधात विदर्भवादी संघटना, बहुजन विचार मंच, संघर्ष समिती, विविध...


Gajanan Maharaj Palkhi Akola : पातूरच्या घाटातील गजानन महाराजांच्या पालखीचं विहंगम दृश्य Exclusive

Gajanan Maharaj Palkhi Akola : पातूरच्या घाटातील गजानन महाराजांच्या पालखीचं विहंगम दृश्य Exclusive अकोल्यात गजानन महाराजांच्या पालखीचं काल मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आल.. आजही पालखी अकोल्यात मुक्कामी असणार आहे... गजानन महाराजांच्या पालखीचे हे 55 वे वर्ष आहेय. यावर्षी पालखीत साडेसहाशेंवर वारकऱ्यांचा समावेश आहेय. विशेष म्हणजे दरवर्षी सारखाच यावर्षीही वारीमध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. अकोल्यातील ड्रोन दृष्यांसह गजानन महाराजांच्या पालखीतील उत्साहाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी... गजानन महाराजांच्या पालखीनं आज अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश केलाय. 13 जूनला शेगावातून निघालेली गजानन महाराजांच्या पालखीने नागझरी, पारस, भौरद, अकोला, वाडेगाव, पातूरमार्मागे वाशिम जिल्ह्यातील मेडशीत प्रवेश केलाय. या पालखीतील एक अतिशय महत्वाचा आणि सुंदर टप्पा म्हणजे पातूरचा घाट. संत गजानन महाराजांच्या पालखीचा वाशिम जिल्ह्यातील मेडशीत प्रवेश, पातूर घाटातून पालखी वाशिममध्ये दाखल.


Maratha Reservation: जरांगे साहेब आरक्षणाशिवाय मागे हटू नका, चिऊ मला माफ कर, पुण्यात मराठा आंदोलकाचा भयंकर निर्णय

Pune Maratha Andolak Ends Life: मराठा आरक्षणासाठी आणखी एका आंदोलकाने आपला जीव दिल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यात एका मराठा आंदोलकाने पत्र लिहून पत्नीची माफी मागितली आपली जीवन यात्रा संपवली आहे.


Sharad Pawar Baramati : शरद पवारांचा बारामतीत झंझावात ; नागरिकांना साद

Sharad Pawar Baramati : शरद पवारांचा बारामतीत झंझावात ; नागरिकांना साद शरद पवारांचा बारामती दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे.. दुसऱ्या दिवशी शरद पवार सहा गावांत शेतकरी जनसंवाद दौरा करणार आहेत.. विशेष म्हणजे अजित पवारांचं घर असलेल्या काटेवाडीत शरद पवारांचा संध्याकाळी जनसंवाद मेळावा आहे. आज सकाळी पवारांनी गोविंदबागेत जनता दरबार घेतला. पवारांनी बारामतीकरांच्या समस्या जाणून घेतला. सांगवी गावातही पवारांनी जनसंवाद मेळाव्यात मार्गदर्शन केलं. त्यानंतर शरद पवारांनी खांडज गावात नागरिकांशी संवाद साधला. नीरा कारखाना, सोमेश्वर आणि माळेगाव इथल्या प्रदूषणाच्या समस्येवर पवार बोलले. प्रलंबित कामं करायची असतील तर राज्य हातात दिलं पाहीजे अशी साद पवारांनी घातली. सांगवी गावातही पवारांनी जनसंवाद मेळाव्यात मार्गदर्शन केलं. त्यानंतर शरद पवारांनी खांडज गावात नागरिकांशी संवाद साधला.


Uddhav Thackeray: 'ए़नडीएमध्ये पुन्हा कधीच जाणार नाही', उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती

Mumbai Uddhav Thackeray: शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात साजरा करण्यात आला. या वेळी ठाकरे गटाने निवडून आलेल्या सर्व खासदारांचा उद्धव ठाकरे यांनी सत्कार केला; तसेच लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्व उमेदवारांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.


परदेशात शिक्षण घेण्यासाठी कर्ज कसे घ्यावे

उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे लोक अनेकदा स्वप्न पाहतात. यामुळे त्यांना चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळण्याची आशा आहे. तथापि, प्रत्येकजण ते घेऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कर्ज खूप उपयुक्त ठरते.


Big Breaking : UGC-NET परीक्षा रद्द, परीक्षेत गैरप्रकार; तपास CBI कडे

केंद्र सरकारने 18 जून रोजी झालेली UGC-NET परीक्षा रद्द केलीय.. 18 जून रोजी झालेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय आहे..


Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 19 June 2024

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 19 June 2024 आज शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन. शिंदेंचा वर्धापन दिन मुंबईत वरळी डोम इथं तर ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅबिनेटची आज संध्याकाळी ५ वाजता बैठक, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीचीही बैठक होणार. राज्यात आजपासून पोलीस भरतीला सुरुवात...१७ हजार जागांसाठी तब्बल १७ लाख अर्ज, ४० टक्के उमेदवार उच्चशिक्षित... मुंबईतील ५० पेक्षा अधिक रुग्णालय, महाविद्यालय आणि मुंबई महापालिका मुख्यालयाला धमकीचा ई-मेल, पोलिसांचा तपास सुरु. मी दादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत, एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांचं अतिशय सूचक विधान छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर एव्हाना मुख्यमंत्री झाले असते, संजय राऊतांचं वक्तव्य तर शिवसेना सोडणारे सगळे अस्वस्थ आत्मे, राऊतांची टीका