बातम्या

Trending:


Aadhaar and Ration Card Link: रेशनकार्ड आधारसोबत लिंक केले का? त्वरा करा शेवटची तारीख आली जवळ

Aadhar card ration card link Maharashtra: पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केल्यावर आता रेशन कार्डसोबत आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तुम्ही आपल्या रेशनकार्ड सोबत आधारकार्ड लिंक केले नसेल तर तात्काळ करुन घ्या. जाणून घ्या हे काम तुम्ही कसे करू शकता.


Jalna Rasta Roko : धुळे-सोलापूर महामार्गावरील रास्ता रोको आंदोलकांकडून मागे

Jalna Rasta Roko : धुळे-सोलापूर महामार्गावरील रास्ता रोको आंदोलकांकडून मागे महाराष्ट्रातल्या शासनाने आतापर्यंत दाखल घ्यायला हवी होती आम्ही मोठे बॅकग्राऊंड असलेले कार्यकर्ते नाहीत आम्ही कुठल्याही राजकीय चेहरा नसलेले कार्यकर्ते आहोत म्हणून शासनाला आमची दखल घेऊ वाटत नाही आमची दखल नका घेऊ पण VJ एनटी ओबीसींची बाजू काय आहे हे तरी समजून घ्याव फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी कायम फेसलेस राहिला महाराष्ट्रातील गरजवंत मराठा आर्थिक दृष्ट्या गरीब आहे, म्हणून त्यांना ओबीसी आरक्षण भेटल्यावर न्याय मिळतो हे कोणी सांगितले आरक्षण गरिबी हटाव चां कार्यक्रम नाही माय बाप सरकार samjun घ्या मी घरापासून दुरू आलो तरी जालना बीड , परभणी भागात मी गेलेलो आहे, खरं बोलायला तयार नाहीत महाराष्ट्रातील शासन करते, ते दूर पळत आहेत जरांगे जी बाजू मांडत आहेत त्याचे उत्तर ओबीसी आरक्षण नव्हे ओबीसी आरक्षण मिळाल्यावर मराठा समाजाला न्याय मिळतो हे सांगणारे जरांगेचे सल्लागार कोण आहेत??


अग्रलेख: मतैक्याचे मृगजळ..

गेला आठवडा युक्रेनच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. या आठवडय़ाच्या मध्यावर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युद्धविरामाचा एकतर्फी प्रस्ताव मांडला.


Manoj Jarange Exclusive : 127 जागांची चाचपणी पूर्ण, मनोज जरांगे विधानसभा लढवण्याच्या तयारीत

Manoj Jarange Exclusive : 127 जागांची चाचपणी पूर्ण, मनोज जरांगे विधानसभा लढवण्याच्या तयारीत सरकारने आरक्षण दिले नाही तर मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी 127 जागांवर पहिला सर्व्हेदेखील केला आहे. खुद्द जरांगे यांनी एबीपी माझाशी बोलताना ही घोषणा केली आहे. मात्र ते स्वतः निवडणूक लढवणार नाहीत.. स्वतःचा पक्ष काढून उमेदवार उभे करायचे की अपक्ष म्हणून उभे करायचे हे अजून ठरलेलं नाही. वेळ आली तर मराठा, मुस्लिम आणि दलित, लिंगायत यांची मोट बांधून निवडणूक लढवणार असंही जरांगेंनी सांगितलंय. मनोज जरांगे म्हणाले, सरकारला मी वेळ दिलेला नाही, सरकारने वेळ घेतला आहे. मी अगोदर देखील सांगितले होती की, आम्ही तयारी करतोय. माझा आणि माझ्या समाजाचा दोघांचाही राजकरणात येण्याचा कोणताही उद्देश नाही पण सरकारच आम्हाला राजकारणात ढकलत आहे. आम्ही पहिल्या टप्प्यात 24 मतदारसंघाची चाचपणी केली आहे. आम्ही शोध घेत आहे. आम्ही शांत का बसावे? कोणत्याही समाजावर अन्याय नाही झाला पाहिजे. इतर समाजांनी देखील आमच्यासोबत आले पाहिजे, यासाठी चाचपणी करत आहे.


मुक्ताईच्या पालखीला 315 वर्षांची वैभवशाली परंपरा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करीत मंगळवार (दि.18) रोजी रवाना झाली आहे. एक हजार ते दीड हजार वारकरी पांडुरंगाच्या भेटीला मार्गस्थ झालेले आहेत. 315 वर्षांची वैभवशाली परंपरा राज्यातील सर्वच दिंड्यांपेक्षा जास्त अंतर म्हणजेच 600 कि.मी. अंतर व 25 मुक्काम असलेली ही एकमेव दिंडी असल्याने मुक्ताई दिंडीचे महत्त्व आहे. सकाळीच संस्थानतर्फे …


Naval Bajaj is New ATS Chief: नवल बजाज महाराष्ट्राचे नवे ATS प्रमुख!

Naval Bajaj Appointed As Maharashtra New ATS Chief : मुंबई : वरिष्ठ पोलीस अधिकारी नवल बजाज (Naval Bajaj) यांची महाराष्ट्र पोलीस दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदानंद दाते (Sadanand Date) यांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्र एटीएस प्रमुखाचं पद रिक्त होतं. त्यामुळे एटीएस प्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होतं. अखेर नवल...


Mumbai Sion Flyover: मुंबईकरांसाठी कामाची बातमी: शीव उड्डाणपूल बंद, कारण...

Mumbai Sion Flyover: आयआयटी आणि मध्य रेल्वेच्या संरचनात्मक तपासणी अहवालात शीव रेल्वे उड्डाणपूल धोकादायक ठरला आहे. अहवालातील शिफारशीनुसार पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. सध्या खबरदारीचा उपाय म्हणून अवजड वाहतूक बंद करण्यात येईल.


Tamil Nadu Illicit Liquor: तामिळनाडूत विषारी दारूने घेतला 25 जणांचा बळी, 60 जण गंभीर

Tamil Nadu Kallakurichi 25 dead : तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. या ठिकाणी विषारी दारूने तब्बल 25 जणांचा बाळी घेतला आहे. तर 60 हून अधिक लोक गंभीर असून त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही लोकांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटकही केली आहे.


Buldhana Farming : पेरलेल्या पिकाला पावसाअभावी सिंचनाचा आधार; शेतकरी चिंतेत

Buldhana Farming : पेरलेल्या पिकाला पावसाअभावी सिंचनाचा आधार; शेतकरी चिंतेत बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात पावसाची दडी, लाखो हेक्टर क्षेत्रावर पेरण्या खोळंबल्या, काही भागात स्प्रिंकलर्सने पाणी देण्याची वेळ हेही वाचा: बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात पावसाची दडी, लाखो हेक्टर क्षेत्रावर पेरण्या खोळंबल्या, काही भागात स्प्रिंकलर्सने पाणी देण्याची वेळ राज्यात आजपासून पोलीस भरतीला सुरुवात...१७ हजार जागांसाठी तब्बल १७ लाख अर्ज, ४० टक्के उमेदवार उच्चशिक्षित... शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या पुन्हा ऑनलाईनच होणार, दुर्गम भागात काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना मिळणार न्याय मी दादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत, एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांचं अतिशय सूचक विधान कोणत्याही पक्षात जाणार नाही, कोणत्याही नेत्याला भेटलो नाही, नाराजीच्या चर्चेवर छगन भुजबळांची एबीपी माझाला EXCLUSIVE प्रतिक्रिया... विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू, दिल्लीत केंद्रीय नेतृत्वासह मंथन, मित्रपक्षांना सोबत घेत निवडणूक जिंकण्याचा निर्धार देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहणार, पियूष गोयलांची माहिती...दिल्लीतल्या बैठकीत राजीनाम्याबाबत कोणतीच चर्चा नाही... २०० हून अधिक विधानसभेच्या जागा लढण्याची घोषणा केल्यावर राज ठाकरेंचा पहिलाच नाशिक दौरा, उद्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन निवृत्तीनाथांच्या पालखीतही सहभागी होणार आरटीई प्रवेशांबाबत माहिती देण्यास शाळांची टाळाटाळ, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती, योग्य ती माहिती सादर करण्याचे कोर्टाचे शाळांना निर्देश


Rohit Pawar : भुजबळांसह अनेक नेते अधिवेशनानंतर पक्ष सोडतील : रोहित पवार

Rohit Pawar : भुजबळांसह अनेक नेते अधिवेशनानंतर पक्ष सोडतील : रोहित पवार दरम्यान भुजबळांसह अनेक आमदार आणि नेते अधिवशेनानंतर पक्ष सोडतील असा दावा रोहित पवारांनी केलाय. तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं तेव्हाच बोलायला हवं होतं.. असं सांगत बच्चू कडू यांनी निशाणा साधलाय.. गेले काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ हे पक्ष सोडतील अशा चर्चा सुरू आहे, मात्र छगन भुजबळ यांनी या चर्चा फेटाळून लावल्या, पण याबाबत बोलत असताना भुजबळांनी "मी अजित पवारांसोबत नाही तर राष्ट्रवादीसोबत आहे" असं सूचक विधान केलं होतं... याबाबत आमदार रोहित पवार यांना विचारले असता त्यांनी छगन भुजबळ हे अनुभवी नेते असून त्यांना भविष्याचा अंदाज आला असावा केवळ छगन भुजबळच नाही तर अनेक नेते आणि आमदार पक्ष सोडतील असं सूचक विधान रोहित पवार यांनी केला आहे... सोबतच येऊ घातलेल्या अधिवेशनामध्ये निधी मिळवून घेतील आणि नंतर पक्षाला रामराम करतील असा टोला रोहित पवारांनी लगावलाय.


शीव उड्डाणपुलावर अवजड वाहनांना बंदी

वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला एलबीएस मार्ग, धारावी आणि शीव यांना जोडणाऱ्या, शीव स्थानकावरील अत्यंत महत्वाच्या उड्डाणपुलावर अवजड वाहनांना प्रवासास बंदी घालण्यात आली आहे.


नीट सुधारा!

शिक्षण आणि आरोग्य सुविधांचे जाळे देशाच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोहोचवले, तरच विकास तळागाळापर्यंत झिरपेल, असे प्रतिपादन नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी केले होते; परंतु आजही या दोन्ही तरतुदींवर आवश्यक तेवढा खर्च केला जात नाही. एवढेच नव्हे, तर शिक्षण हळूहळू खासगी संस्थांच्या हवाली झाले आहे. कॉपी, पेपरफुटी तसेच भरती प्रक्रियेतील भ—ष्टाचारामुळे हे क्षेत्र बदनाम होत आहे. उत्तम …


Marathwada water Supply : मराठवाड्याला 1 हजार 841 टँकरनं पाणीपुरवठा ; पावसाळ्यातही पाणीबाणी

Marathwada water Supply : मराठवाड्याला 1 हजार 841 टँकरनं पाणीपुरवठा ; पावसाळ्यातही पाणीबाणी पावसाळा सुरू होऊन दोन आठवडे उलटले, तरीही मराठवाड्यात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सुमारे 20 लाख नागरिकांची तहान टँकरद्वारे भागवली जात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सुमारे 10 टक्के नागरिकांना पाण्यासाठी वणवण करत असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात आज घडीला 2 हजार 97 गावांना 1 हजार 841 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे टँकरची संख्या भर पावसाळ्यात कमी होण्यापेक्षा वाढताना पाहायला मिळतात. 20 लाख नागरिकांची तहान टँकरद्वारे भागवली जात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सुमारे 10 टक्के नागरिकांना पाण्यासाठी वणवण करत असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात आज घडीला 2 हजार 97 गावांना 1 हजार 841 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे विशेष म्हणजे टँकरची संख्या भर पावसाळ्यात कमी होण्यापेक्षा वाढताना पाहायला मिळतात.


Uddhav Thackeray: 'ए़नडीएमध्ये पुन्हा कधीच जाणार नाही', उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती

Mumbai Uddhav Thackeray: शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात साजरा करण्यात आला. या वेळी ठाकरे गटाने निवडून आलेल्या सर्व खासदारांचा उद्धव ठाकरे यांनी सत्कार केला; तसेच लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्व उमेदवारांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.


ठाकरे गट मोदींकडे जाणार? छगन भुजबळ ठाकरे गटात येणार? उद्धव ठाकरे यांचा भर सभेत खुलासा

ठाकरे गट मोदींकडे जाणार? छगन भुजबळ ठाकरे गटात येणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळाता लंगली आहे. उद्धव ठाकरे यांनी भर सभेत याचा खुलासा केला आहे.


western Railway Mumbai : मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेला फटका; 30 ते 40 मिनिटे ट्रेन उशिरा

Western Railway Mumbai : मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेला फटका; 30 ते 40 मिनिटे ट्रेन उशिरा बोईसर-उमरोळीदरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक ३० ते ४० मिनिटे उशिराने हेही वाचा: खरीप हंगामासाठी १४ पिकांच्या हमीभावात केंद्र सरकारकडून वाढ, धानाचा हमीभाव आता २३०० रुपये तर कपाशीला ७ हजार १२१ रु. प्रति क्विंटल मिळणार मंगळवारी घेतलेली UGC-NET परीक्षा रद्द, परीक्षेत गैरप्रकार झाल्यानं केंद्रीय शिक्षण खात्याचा निर्णय, UGC-NET परीक्षा पुन्हा घेणार, तारीख लवकरच कळणार यूजीसी नेट परीक्षा रद्द केल्यावर आता नीट परीक्षाही रद्द करा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंची मागणी, पंतप्रधानांनी नीट परीक्षेतल्या घोळाची जबाबदारी स्वीकारावी, खर्गेंची टीका पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांनाही आता मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मन योजनेचा लाभ, २२ लाख लाभार्थ्यांना लाभ, मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला त्या भाजपसोबत कधीच जाणार नाही, शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंचा निर्धार उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट पाठिंबा, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना चिमटा, तर पुन्हा येईन म्हणणारे आता जाऊ द्या ना घरी आता वाजवले की बारा म्हणतायत, फडणवीसांनाही खोचक टोला देशभक्त मुस्लिमांनी आम्हाला मतं दिली हे जाहीर सांगतो, सत्ताधाऱ्यांना उद्धव ठाकरेंचं उत्तर, तर तमाम हिंदूबांधव म्हणण्य़ाचं धाडस ठाकरेंनी केलं नाही, शिंदेंचा पलटवार


IRCTC Ticket Booking : चुकूनही करू नका IRCTC ID वरून दुसऱ्यांसाठी Train Ticket बुक, अन्यथा जावे लागेल जेल

IRCTC Ticket Booking Rule: जर तुम्ही रेल्वेतून प्रवास करण्याआधी IRCTC वरून तिकीट बुक करत असाल तर रेल्वेचा हा नियम तुम्हाला माहिती असावा. IRCTC आयडीवरून दुसऱ्याचे तिकीट बुक केल्यास १० हजार रुपये दंड किंवा ३ वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो.


Shivrajyabhishek Din Nagpur:तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन;शिवरायांना मानवंदना देण्यासाठी जय्यत तयारी

Shivrajyabhishek Din Nagpur:तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन;शिवरायांना मानवंदना देण्यासाठी जय्यत तयारी रायगडावर आज ३५१वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होतोय. ६ जूनप्रमाणे या शिवराज्याभिषेकाची देखील प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे. रायगडावर ७ वाजता शिवरायांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. ८ वाजता नगारखान्यासमोर ध्वजारोहण केलं जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या हस्ते मुख्य शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगडावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकीकडे पावसाची रिमझिम सुरु असून तेवढ्याच उत्साहात शिवभक्त गडावर दाखल होताना दिसत आहेत. रायगडावर आज तिथीनुसार 351 वा शिवराज्यभिषेक सोहळा शासकीय यंत्रणा रायगडावर सज्ज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार शिवराज्यभिषेक गडावर पोलिस बंदोबस्त तैनात Anchor - आज रायगडावर 351 वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होतोय सकाळी 8 वाजता ध्वजारोहण त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे, गडावर मोठया स्वरूपात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे ,पावसाची रिमझीम एकीकडे सूरु असुन तेवढ्याच उत्साहात शिवभक्त मात्र गडावर दाखल होताना दिसत आहेत.


Google Chrome वापरताय सावधान! सरकारने दिला Alert, सांगितला मोठा धोका

नवी दिल्ली : इंटरनेटवर कोणत्याही स्वरूपाचं काम करायचं असेल तर बहुतांश युजर्स गुगलचा वापर करतात. त्यामुळे इंटरनेट म्हणजे गुगल असं समीकरण तयार झालं आहे. पण सायबर गुन्हेगारीचा वाढता धोका पाहता इंटरनेटवर काम करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अनेक युजर्स रोज गुगल क्रोम ब्राउझरचा वापर करतात. सरकारने आता गुगल क्रोम ब्राउझर युजर्सना एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. काही कारणांमुळे युजर्सचा खासगी डाटा हॅकर्सच्या हाती लागू शकतो. त्यामुळे युजर्सने...


राणेंविरोधात विनायक राऊतांची तक्रार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : निवडणूक प्रचार कालावधी संपलेला असतानाही रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांचे समर्थक प्रचार करत होते. त्यांनी भ्रष्ट मार्गाचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी केली आहे. तसेच राणे यांच्यावर 5 वर्षे निवडणूक लढविण्यावर …


Big Breaking : UGC-NET परीक्षा रद्द, परीक्षेत गैरप्रकार; तपास CBI कडे

केंद्र सरकारने 18 जून रोजी झालेली UGC-NET परीक्षा रद्द केलीय.. 18 जून रोजी झालेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय आहे..


MSP Increase Modi Cabinet: शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 14 पिकांच्या एमएसपीत वाढ, केंद्र सरकारचा निर्णय

MSP Increase Modi Cabinet: केंद्रातील एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक 19 जून रोजी पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत मंत्रिमंडळाने खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत 14 खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.


Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 20 June 2024

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 20 June 2024 खरीप हंगामासाठी १४ पिकांच्या हमीभावात केंद्र सरकारकडून वाढ, धानाचा हमीभाव आता २३०० रुपये तर कपाशीला ७ हजार १२१ रु. प्रति क्विंटल मिळणार पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांनाही आता मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मन योजनेचा लाभ, २२ लाख लाभार्थ्यांना लाभ, मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला त्या भाजपसोबत कधीच जाणार नाही, शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंचा निर्धार उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट पाठिंबा, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना चिमटा, तर पुन्हा येईन म्हणणारे आता जाऊ द्या ना घरी आता वाजवले की बारा म्हणतायत, फडणवीसांनाही खोचक टोला देशभक्त मुस्लिमांनी आम्हाला मतं दिली हे जाहीर सांगतो, सत्ताधाऱ्यांना उद्धव ठाकरेंचं उत्तर, तर तमाम हिंदूबांधव म्हणण्य़ाचं धाडस ठाकरेंनी केलं नाही, शिंदेंचा पलटवार


SSC GD Results 2024: खुशखबर..! निकाल जाहीर होण्याआधीच रिक्त पदांची संख्या झाली दु्प्पट, येथे पाहा सुधारित जागा

SSC GD Results 2024 : एसएससी जीडी निकाल २०२४ जाहीर होण्यापूर्वी, रिक्त पदांच्या संख्येत बदल करण्यात आला आहे. रिक्त पदांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. नवीन रिक्त पदांची संख्या ४६,६१७ झाली आहे. वाचा सविस्तर..


IIT Bombey : नाटकात प्रभू श्रीराम, सीतामातेचा अपमान केल्याचा आरोप; IIT बॉम्बेकडून विद्यार्थ्यांना 1.2 लाखांचा दंड

IIT Bombey : रामायणावर (Ramayana) कथितरित्या आक्षेपार्ह्य नाटकाचं सादरीकरण केल्याप्रकरणी आयआयटी बॉम्बेनं (IIT Bombey News) विद्यार्थ्यांना दंड ठोठावला (Students Were Fined) आहे. हा दंड थोडा थोडका नसून तब्बल 1.2 लाखांचा आहे. 31 मार्च रोजी आयआयटी बॉम्बेचा वार्षिक कला मोहोत्सव (IIT Bombay Annual Art Festival) पार पडला. याच कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी रामायणावर आधारित नाटक सादर करण्यात आलं. पण या नाटकात भगवान सीता-रामाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात...


CM Eknath Shinde Full Speech : आदित्य ठाकरेंना टार्गेट, हिंदुत्वावरुन शिंदेंचा हल्लाबोल

CM Eknath Shinde Full Speech : आदित्य ठाकरेंना टार्गेट, हिंदुत्वावरुन शिंदेंचा हल्लाबोल सात खासदार निवडून आले तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना स्थापन केली त्याचा वर्धापन दिवस १९६६ साली शिवसेना स्थापन... मराठी माणूस न्याय हक्क नोकऱ्या या सर्व घोस्थी करत असताना शिवसेनेची व्यापकता वाढली... लोकप्रिय झाली... शिवसेना वाढली कोकणात, संभाजी नगरात महाराष्ट्रात... आपण बले किल्ले अबाधित राखले... लाखांच्या मताने जिंकलो... कोकणात एक पण जागा UBT ला मिळू शकली नाही . घासून पुसून नाही ठासून विजय मिळवला . शिवसेनेचा परंपरागत मतदार आपल्यासोबत... शिवसेनेच्या हक्काचा मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवला... मी तुमच्यापुढे नतमस्तक होती.. काँग्रेस च्या दावणीला बांधली शिवसेना सोडवायला आपण उठाव केला .. २ वर्षापूर्वी आपण उठाव केला... तो खऱ्या अर्थाने त्यावर जनतेने शिक्कामोर्तब केलं... मतदारांनी दाखवलेला विश्वास ल हा शिंदे तडा जाऊ देणार नाही... जमलेल्या माझ्या तमाम हिंदू मातांनो भगिनी नो... पण आज त्यांचा वारसा म्हणणारे हिंदू बोलायला लाज वाटते त्यांना.. हिंदू शब्दाची अलार्जी आली... इंडिया आघाडी सभेत आणि आजच्या सभेत त्यांनी हिंदू बोलण्याचे धाडस नाही केलं... बाळासाहेब आणि त्यांचा फोटो वापरून मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही ... मी हिंदु आहे आमचे हिंदुत्व असे ... कुठे गेलं ते ...


Burger King मध्ये बसलेल्या तरुणावर झाडल्या 10 गोळ्या, गँगवॉरने शहर हादरलं

नवी दिल्ली : मंगळवारी रात्री गोळीबाराची घटना घडल्याने दिल्ली हादरून गेली. राजौरी गार्डनमधल्या बर्गर किंग आउटलेटमध्ये एका युवकावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी पोलीस तपास वेगात सुरू आहे; पण सोशल मीडियावरच्या एका व्हायरल मेसेजने प्रकरणाचा अँगल बदलला आहे. या मेसेजवरून ही हत्या गँगवॉर अर्थात टोळीयुद्धातून झाल्याचं दिसतं.दिल्लीतल्या राजौरी गार्डन परिसरात मंगळवारी रात्री खुलेआम एका युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बर्गर किंग...


Special Report BJP Delhi : भाजप एका व्यक्तीवर अवलंबून नसेल, पक्षश्रेष्ठींची भूमिका

Special Report BJP Delhi : भाजप एका व्यक्तीवर अवलंबून नसेल, पक्षश्रेष्ठींची भूमिका राज्यातल्या महायुतीच्या विशेषतः भाजपच्या सुमार कामगिरीचं दिल्लीत मंथन झालं. राज्यात भाजपच्या सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासोबत राज्यातल्या नेतृत्वाला कानपिचक्या देण्याचं कामही दिल्लीत वरिष्ठ नेतृत्वाने केलं... काय घडलं नेमकं दिल्लीत पाहूया महाराष्ट्रात 40 प्लसचा नारा देणाऱ्या भाजपला दोन आकडी संख्याही गाठता आली नाही. लोकसभेतल्या या सुमार कामगिरीवर अमित शाह आणि जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील प्रमुख भाजप नेत्यांची शाळा घेण्यात आली. कोणा एकाच व्यक्तीवर पक्ष अवलंबून राहणार नाही असं फर्मानही देताना दिल्लीश्वरांनी विकेंद्रीकरणाचे संकेत दिलेत. महाराष्ट्रात भाजपमध्ये कोणताही समन्वय नाही सामूहिक जबाबदारी घेत चुका सुधारा पक्ष एका व्यक्तीवर अवलंबून नसेल कोअर कमिटी एकत्रितपणे पक्ष चालवेल सर्वच नेत्यांना सक्रिय व्हावं लागेल आतापासून विधानसभेच्या तयारीला लागा, उमेदवार तयार करा कुठे कशी मत मिळाली यावर सविस्तर चर्चा झाली विधानसभेचा रोडमॅप यावर चर्चा झाली. मित्र पक्षांसोबत कशा रीतीने निवडणूक काढता येईल याचा रोडमॅप आम्ही विचार केला आहे. लवकरच घटक पक्षांसोबत कसं पुढे जाता येईल यावर आम्ही चर्चा करणार आहोत लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी सरकारमधून मोकळं करण्याची विनंती केली. यावर अंतिम निर्णय झाला नसला तरी तूर्तास फडणवीसांच्या खांद्यावरचा उपमुख्यमंत्रीपदाचा भार कायम असणार आहे.


Police Recruitment: नवी मुंबई पोलीस भरतीसंदर्भात मोठी अपडेट; प्रक्रिया पुढे ढकलली, कधी होणार परीक्षा? जाणून घ्या नवी तारीख

Navi Mumbai Police Recruitment: नवी मुंबई पोलीस मुख्यालयामध्ये आज होणारी भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती उपायुक्त संजय पाटील यांनी दिली. भरती प्रक्रियेची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे.


भारतीय बांगड्यांची किणकिण ८००० वर्ष जुनी..

बांगड्या हा भारतीय स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. भारतीय संस्कृतीत बांगड्यांचा संबंध समृद्धीशी जोडला जातो. त्याच निमित्ताने प्राचीन काळापासून भारतीय उपखंडातील शंखांपासून तयार करण्यात येणाऱ्या बांगड्यांच्या इतिहासाचा घेतलेला हा आढावा.


Assam floods : आतापर्यत २६ जणांचा मृत्‍यू; १.६१ लाख बाधित

करीमगंज (आसाम) ; पुढारी ऑनलाईन आसाममधील पूरस्थिती अजूनही गंभीर बनली आहे. 15 जिल्ह्यांतील 1.61 लाखांहून अधिक लोक महापूरामुळे प्रभावित झाले आहेत. पुरामुळे राज्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एएसडीएमए) पुराच्या अहवालानुसार, हैलाकांडी जिल्ह्यात मंगळवारी एका व्यक्तीचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. करीमगंज जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर बनली आहे कारण 41,711 …


Gajanan Maharaj Palkhi Akola : पातूरच्या घाटातील गजानन महाराजांच्या पालखीचं विहंगम दृश्य Exclusive

Gajanan Maharaj Palkhi Akola : पातूरच्या घाटातील गजानन महाराजांच्या पालखीचं विहंगम दृश्य Exclusive अकोल्यात गजानन महाराजांच्या पालखीचं काल मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आल.. आजही पालखी अकोल्यात मुक्कामी असणार आहे... गजानन महाराजांच्या पालखीचे हे 55 वे वर्ष आहेय. यावर्षी पालखीत साडेसहाशेंवर वारकऱ्यांचा समावेश आहेय. विशेष म्हणजे दरवर्षी सारखाच यावर्षीही वारीमध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. अकोल्यातील ड्रोन दृष्यांसह गजानन महाराजांच्या पालखीतील उत्साहाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी... गजानन महाराजांच्या पालखीनं आज अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश केलाय. 13 जूनला शेगावातून निघालेली गजानन महाराजांच्या पालखीने नागझरी, पारस, भौरद, अकोला, वाडेगाव, पातूरमार्मागे वाशिम जिल्ह्यातील मेडशीत प्रवेश केलाय. या पालखीतील एक अतिशय महत्वाचा आणि सुंदर टप्पा म्हणजे पातूरचा घाट. संत गजानन महाराजांच्या पालखीचा वाशिम जिल्ह्यातील मेडशीत प्रवेश, पातूर घाटातून पालखी वाशिममध्ये दाखल.


mumbai ice cream case: आईस्क्रीममध्ये सापडलेलं 'ते' बोट कोणाचं? धक्कादायक माहिती उजेडात

Mumbai Ice Cream Case: मुंबईतील मालाड परिसरातील एका महिला डॉक्टरने ऑनलाईन आईस्क्रीम ऑर्डर केलं होतं. आईस्क्रीम कोनमध्ये कापलेलं मानवी बोट आढळून (Finger Inside Cone Ice Cream) आल्याने खळबळ उडाली होती. आता या प्रकरणी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. आईस्क्रीममध्ये सापडलेलं 'ते' बोट कोणाचं? याचा देखील पोलिस चौकशीत (Pune Police Investigation) उलगडा झाला आहे.


Maharashtra SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा | मुंबई सुपरफास्ट | ABP Majha | 3 PM

Maharashtra SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा | मुंबई सुपरफास्ट | ABP Majha | 3 PM राज्यात आजपासून पोलीस भरतीला सुरुवात, १७ हजार जागांसाठी १७ लाख अर्ज, ४० टक्के उमेदवार गरजेपेक्षा उच्चशिक्षित. आरटीई प्रवेशांबाबत माहिती देण्यास शाळांची टाळाटाळ, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती, प्रशासनाला योग्य ती माहिती सादर करण्याचे शाळांना हायकोर्टाकडून निर्देश शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या पुन्हा ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय, दुर्गम भागात सेवा देणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकांना मिळणार न्याय. रेशनकार्ड-आधारकार्ड लिंक करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत, याआधी 30 जूनपर्यंत मुदत होती एलआयसी मेट्रो शहरातील मालमत्ता विकणार असल्याची चर्चा, या मालमत्ता विक्रीतून सहा ते सात अब्ज डॉलर उभे करण्याची एलआयसीची योजना, मात्र एलआयसीने फेटाळली शक्यता पुढचे काही दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अंदाज. राज्यात यंदा पावसाच्या हंगामात सरासरीपेक्षा तीन मिमी जास्त पाऊस, राज्यात या काळात सरासरी १०२ मिमी पाऊस पडतो, मात्र यंदा प्रत्यक्षात १०५.८ मिमी पाऊस पडलाय.


Rahul Gandhi Happy Birthday : राहुल गांधींच्या वाढदिवशी काँग्रेसकडून कुलरचं वाटप!

राहुल गांधी यांनी यंदा लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश संपादन केलं आहे. वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून त्यांना यश मिळालं. त्यांनी वायनाडची जागा सोडली असून या ठिकाणाहून आता प्रियंका गांधी निवडणूक लढवणार करणार आहेत.


Shivsena Foundation Day : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांनध्ये उत्साह

Shivsena Foundation Day : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांनध्ये उत्साह शिवसेनेचा ५८वा वर्धापन दिन आज ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना स्वतंत्रपणे साजरा करणार आहेत.. या वर्धापन दिना निमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटांचे कार्यक्रम होणार आहे.. ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन माटुंगा येथील बन्मुखानंद सभागृहात होत आहे तर शिंदे गटाचा वर्धापन दिन सोहळा वरळी येथील डोम एनएससीआय सभागृहात होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे बिगुल दोन्ही शिवसेना नेते या मेळाव्यात फुंकण्याची शक्यता आहे शिवसेनेतल्या पक्ष फुटीनंतर हा दुसरा वर्धापन दिन आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आपला वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहेत. शिंदेंचा वर्धापन दिन मुंबईत वरळी डोम इथं तर ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा लागलेला निकाल आणि तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर या वर्धापन दिनाला महत्त्व आहे.


Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासाठी मोठी बातमी, वाढवण बंदराला मंजुरी मिळाली

Today Breaking News LIVE Updates : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घडामोडींसहीत देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...


परदेशात शिक्षण घेण्यासाठी कर्ज कसे घ्यावे

उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे लोक अनेकदा स्वप्न पाहतात. यामुळे त्यांना चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळण्याची आशा आहे. तथापि, प्रत्येकजण ते घेऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कर्ज खूप उपयुक्त ठरते.


Maratha Reservation: जरांगे साहेब आरक्षणाशिवाय मागे हटू नका, चिऊ मला माफ कर, पुण्यात मराठा आंदोलकाचा भयंकर निर्णय

Pune Maratha Andolak Ends Life: मराठा आरक्षणासाठी आणखी एका आंदोलकाने आपला जीव दिल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यात एका मराठा आंदोलकाने पत्र लिहून पत्नीची माफी मागितली आपली जीवन यात्रा संपवली आहे.