बातम्या

Trending:


Buddha Purnima 2024 Date: वैशाखमध्ये कधी आहे बुद्ध पौर्णिमा? जाणून घ्या तिथी आणि महत्त्व

Buddha Purnima 2024 Date And Time: हिंदू मान्यतेनुसार गौतम बुद्धांचा जन्म वैशाख महिन्यातील पौर्णिमा तिथीला झाला. याच दिवशी गौतम बुद्धांना आत्मज्ञानही प्राप्त झाले होते. त्यामुळे हिंदू आणि बौद्ध धर्मात वैशाख पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. वैशाख पौर्णिमा ही बुद्ध पोर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे.


पुनश्च परीक्षा

परीक्षा म्हटली की प्रत्येकाकडे अनेक आठवणी असतात. त्यातील काही कडवट तर काही गमतीशीर. काही पेपरमध्ये विद्यार्थ्यांनी लिहून ठेवलेले वाचले की कपाळावर हात मारायची वेळ येते. परीक्षांबद्दलच्या अशाच काही आठवणींविषयी...


स्त्रीधनावर स्त्रीचाच हक्क

[author title=”अ‍ॅड. रमा सरोदे” image=”http://”][/author] वडिलोपार्जित संपत्तीमध्ये पूर्वी महिलांना अधिकार नसल्यामुळे, अडचणीच्या काळात त्यांना आर्थिक आधार लाभावा, या हेतूने स्त्रीधनाची संकल्पना अवतरली; परंतु विवाहानंतर विश्वासाने पतीकडे, सासरच्या मंडळींकडे सुपूर्द केलेल्या या स्त्रीधनाचा परस्पर वापर केल्याची प्रकरणे समोर येऊ लागली. अलीकडेच अशा प्रकारचे एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले असता, याबाबत न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला...


Malshej Ghat Accident: कल्याण-नगर महामार्गावर माळशेज घाटात भीषण अपघात, पती-पत्नीसह चौघांचा मृत्यू

Accident on Kalyan Ahmednagar Highway: कल्याण - अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे.


TMC Mumbai Recruitment 2024: टाटा मेमोरियल सेंटरमध्ये भरती; मुंबईत नोकरी अन् ५४ हजार रुपयांपासून पगाराची सुरुवात

TMC Mumbai Recruitment 2024: टाटा मेमोरेरियल सेंटर यांच्या वेबसाईटवरून भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे...


शब्दकळा: दिठी

दिठी हा शब्द आध्यात्मिक दृष्टीनेच वापरलेला दिसेल. डोळ्यांची खोबण असाही त्याचा एक अर्थ काही जण सांगतात. दृष्टी समोर पाहते, तर आंतरदृष्टी या अर्थाने दिठी हा शब्द अधिक वापरलेला लक्षात येतो.


प्रचार तोफा आज थंडावणार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा रविवारी (दि. 5) थंडावणार आहेत. प्रचाराचा शेवटचा दिवस रविवार सुट्टीचा दिवस आल्यामुळे हा प्रचाराचा सुपरसंडे ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात येणार आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास …


Loksabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस किती जागा जिंकेल? शरद पवारांनी थेट आकडाच सांगितला

Sharad Pawar Reaction on Loksabha Election


Water Shortage: राज्यावर नवं संकट, या भागातील 2344 गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

Water Shortage in Maharashtra: राज्यातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. काही जिल्ह्यांमधील परिस्थिती अतिशय बिकट आहे. त्यामुळे राज्यात सध्या 2344 गावांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सर्वाधिक पाणीटंचाईचा सामना छत्रपती संभागीनगर विभागातील नागरिकांना करावा लागत आहे. या भागात केवळ 11.89 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


वारसा करावरून कोंडी

देशात मध्यमवर्गीयांचा प्रभाव मोठा आहे. याच वर्गापर्यंत भाजपने वारसा कराचा मुद्दा प्रभावीपणे नेला. काँग्रेस वारसा कर आणू इच्छित असून, लोकांची कमाई हडपण्याचा विचार करत आहे, असे भाजपकडून वारंवार सांगितले गेले. ही बाब सातत्याने लोकांच्या मनावर रुजविली जात आहे. मात्र, काँग्रेसकडून त्यास योग्यरित्या प्रत्युत्तर दिले जात नाही. लोकसभेची रणधुमाळी आता तिसर्‍या टप्प्यात पोहोचलेली असताना, भाजप विरुद्ध …


Raj Thackeray : 'नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्...', राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला 'तो' किस्सा!

Raj thackeray On Narayan Rane : राज ठाकरे यांनी कणकवलीमध्ये घेतलेल्या सभेमध्ये नारायण राणे यांनी केलेल्या कामाचं कौतूक केलं. त्यावेळी त्यांनी एक किस्सा देखील सांगितला.


जगभरातच सोन्याला झळाळी का?

जगभरात सोन्याचे भाव गेल्या काही महिन्यांमध्ये कमालीच्या वेगाने वाढताना दिसून आले आहेत. संरक्षण साधनसामग्री खरेदीबरोबरच सोने खरेदीकडे कल वाढत आहे. अनेक इस्लामिक, लॅटिन अमेरिकेतील देश, आफ्रिकन देश यांसह विकसनशील व विकसित देश सोन्याचा प्रचंड साठा करत आहेत. विशेषतः रशिया-युक्रेन युद्धानंतर हा कल अधिक वाढला आहे. येत्या काळात आखातातील परिस्थिती स्फोटक बनली किंवा जागतिक पटलावरची असुरक्षितता …


गांधी प्रतिमानांची आजची भावरूपे

अजय कांडर यांच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ या संग्रहातील कवितेतून महात्मा गांधींविषयीच्या विविध भावजाणिवा प्रकटल्या आहेत.


Traffic Jam at Mount Everes

Traffic Jam at Mount Everes


Chanakya Niti - चाणक्य म्हणाले, या महिलेपासून सावधान; गरज संपली की...

एखाद्याने कोणत्याही ठिकाणाशी, व्यक्तीशी किंवा वस्तूशी जास्त प्रमाणात जोडलं जाऊ नये, कारण ते निघून गेल्यावर तुम्हाला जास्त त्रास होईल. आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीत हे वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे स्पष्ट केलं आहे. प्रजा फक्त तेजस्वी राजाचा आदर करते.. जेव्हा तो शक्तीहीन होतो तेव्हा लोक राजाला सोडून देतात. निसर्ग नियमानुसार झाडांवर राहणारे पक्षी झाडावर सावली, फळं मिळेपर्यंत बसतात. घरात अचानक आलेल्या पाहुण्यांचं खाण्यापिण्यानं स्वागत केलं जातं. तोही सामाजिक नियमांनुसार निरोप घेतो आणि आपल्या इच्छित स्थळी जातो. वेश्या व्यवयास म्हणजे इतर पुरुषांकडून पैसे लुटणं. पैसे संपले की ती त्यांच्याकडे पाठ फिरवते.


आरोग्‍य : खाण्याची धास्ती!

[author title=”योगेश मिश्र, ज्येष्ठ पत्रकार-विश्लेषक” image=”http://”][/author] जगभरात भारतीय उत्पादनांची विश्वासार्हताही अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अलीकडेच भारतातील नामांकित मसाला उत्पादकांवर सिंगापूर आणि हाँगकाँग सरकारने बंदी घातली. मसाले आणि अन्य पदार्थांत थिलीन ऑक्साईड नावाचा रासायनिक पदार्थ असून, त्यामुळे कर्करोग होऊ शकतो, असे बंदी घालताना युरोपिय युनियनने म्हटले आहे. पनीरपासून फळांपर्यंत सर्वत्र भेसळ आढळत आहे. हे …


Dadar Railway Station Express Train Fire | दादर स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला आग; पाहा व्हिडिओ

Dadar Railway Station Express Train Fire


MSRTC Bus Pass: 1170 रुपयांत फिरा अख्खा महाराष्ट्र, एसटीकडून स्पेशल पासची सुविधा

MSRTC Bus Pass Scheme: तुम्ही देखील सुट्ट्यांमध्ये एसटीने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर एसटीने ऑफर केलेली प्रवासी पास योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुमचा प्रवासाचा मोठ्या प्रमाणात खर्च वाचू शकतो. या पासचा वापर करून तुम्ही निवडलेल्या कोणत्याही बसमधून आणि कोणत्याही ठिकाणी विशिष्ट कालावधीत प्रवास करता येतो.


Onion Export News | शेतकऱ्यांना दिलासा देताना निर्यात होऊच नये, याची पण केंद्र सरकारकडून धडपड

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडून लोकसभेच्या मतदानात कांदा निर्यातबंदीचा रोष व्यक्त होईल याची जाणीव झाल्याने केंद्र सरकारने शनिवारी (दि.४) कांदा निर्यातबंदी हटवल्याची घोषणा केली असली तरी या निर्णयाने शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे. एकीकडे कांदा निर्यातबंदी हटविल्याचे जाहीर करताना केंद्र सरकारने कांद्यावर किमान निर्यात मूल्य दर प्रतिटनाला ५५ …


बीडमध्ये पकडं एवढं मोठं घबाड; पैसे पाहून पोलिसांचेही डोळे विस्फारले

बीड, सुरेश जाधव प्रतिनिधी : बीडमधून मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक काळात कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी चेकपोस्ट कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. गेवराई तालुक्यातील खामगाव चेकपोस्टवर एका आलिशान कारमधून नेण्यात येत असलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. कारचालकाकडे कोणतेही कागदपत्रं नसल्यानं पोलिसांचा संशय...


Weather Update : मे महिना आग ओकणार, 6 मे पासून हवामानात मोठा बदल

Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. 40 डिग्रीस सेल्सियसवर पारा गेला आहे. मे महिना प्रचंड ऊन जाणवणार आहे.


Problems of Mango grower Farmers

Problems of Mango grower Farmers | आंबा उत्पादकांच्या समस्या काय? थेट तळकोकणातून ग्राऊंड रिपोर्ट | Loksabha Election


आजचा भारत विकसित आणि विश्वबंधू

भारतीयांसाठी जागतिक कार्यस्थळे खुली होण्यातून केवळ व्यक्तिगत संधीच वाढतील असे नव्हे, तर राष्ट्रीय क्षमतांची व्याप्ती वाढण्यासही मदत होईल.


IRCTC Chardham Yatra Package: कुटुंबासोबत द्या देवभूमीला भेट, या पॅकेजमध्ये फिरा बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री

IRCTC Chardham Yatra Package: IRCTC च्या या चारधाम विशेष पॅकेजचे नाव चारधाम यात्रा पॅकेज EX-मुंबई (WMA59) आहे. या विशेष चारधाम पॅकेजमध्ये तुम्ही बद्रीनाथ, बरकोट, गंगोत्री, गुप्तकाशी, हरिद्वार, जानकी चट्टी, केदारनाथ, सोनप्रयाग, उत्तरकाशी, यमुनोत्री या ठिकाणी भेट देऊ शकता. तसेच या पॅकेजमधील राहण्याची व्यवस्था स्टँडर्ड हॉटेल/गेस्ट हाऊस/तंबूमध्ये असेल.


Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ भीषण अपघात, तिघे ठार, दोघे जखमी

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. आज सकाळी मुंबई कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक ३०४ येथे एका कारचा अपघात झाला असून यात तिघे जण ठार झाले आहेत.


Jammu Kashmir : हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला, हाय अलर्ट जारी

Jammu Kashmir Terrorist Attack : जम्मू काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला असून यात ५ जवान जखमी झाले आहेत. या घटनेनंतर हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे.